महाराष्ट्र गोसेवा आयोग

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र गोसेवा आयोग

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन · गोसेवा आयोग · सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

मुख्यपृष्ठ  / सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

₹२५ लाखकमाल अनुदान
३२४तालुके
५ एकरजमीन आवश्यक
DBTथेट बँकेत

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र – सविस्तर माहिती

01
योजना संक्षेप
🐄३२४पात्र तालुके
२५ लाखकमाल अनुदान
🏛️100%राज्य पुरस्कृत
महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, 1995 लागू झाल्यानंतर संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध लागू करण्यात आला. परिणामी, अनुत्पादक गोवंशीय पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर शासनाने "सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र" योजना सुरू केली.
दिनांक 17.05.2023 रोजी शासन निर्णयाद्वारे सुधारित योजना लागू करण्यात आली. मुंबई व मुंबई उपनगर वगळून ३४ जिल्ह्यांतील ३२४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गोशाळेची निवड करण्यात येते. शासन आदेश क्र. पविआ-१०२४/प्र.क्र.१९१/पदू-३ दि. ११/०७/२०२४ अन्वये सदर योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
2017 – मूळ योजना सुरू
2023 – सुधारित योजना
2024 – गोसेवा आयोगाकडे हस्तांतर
2024-25 – नवीन अर्ज आमंत्रित
योजनेची व्याप्ती
३४जिल्हे
३२४पात्र तालुके
३२४निवडल्या जाणाऱ्या गोशाळा
१८०अनुदान मिळालेल्या गोशाळा
मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळण्यात आले आहेत
02
योजनेचे उद्देश
मूलभूत उद्देश
🐂दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु-पैदाशीस व ओझी वाहण्यास उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे.
🌾अशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे.
🌿वैरण उत्पादन कार्यक्रम राबवून पशुधनासाठी चाऱ्याची शाश्वत व्यवस्था करणे.
♻️गोमूत्र, शेण इत्यादीपासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप-पदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.
पशुसंवर्धन उपक्रम (अनुदान पात्र गोशाळांसाठी)
🧬शुद्ध देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करून देशी गोवंश संवर्धन.
🔬कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नर वासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास नाममात्र दराने उपलब्ध करणे.
🐄उर्वरित वासरे व कालवडी मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करणे.
✂️आंतरपैदास टाळण्यासाठी संस्थेमधील वळूंचे खच्चीकरण करणे आवश्यक.
03
लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती

या योजनेत सहभागी होण्यासाठी संस्थांना खालील अटी पाळाव्या लागतील :

📋
नोंदणी
संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी.
📅
अनुभव
गोवंश संगोपनाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
🌾
जमीन
स्वतःच्या मालकीची किंवा ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर किमान ५ एकर जमीन.
💰
भांडवल
मागितलेल्या अनुदानाच्या किमान १०% खेळते भांडवल असणे आवश्यक.
🏷️
Ear Tagging
भारत पशुधन प्रणालीवर (NDLM) गोशाळा व पशुधनाची Ear Tag नोंदणी अनिवार्य.
🏦
बँक खाते
राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे अनिवार्य. (DBT साठी)
📊
लेखापरीक्षण
मागील ३ वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे आवश्यक.
📝
करारनामा
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यासोबत करारनामा बंधनकारक.
महत्त्वाच्या बाबी
  • ज्या संस्थांकडे पशुधनाच्या देखभालीसाठी स्वतःच्या उत्पन्नाचे साधन आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • प्रशासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेऊनच मूलभूत सुविधा निर्माण करता येतील.
  • पूर्वपरवानगीशिवाय केलेल्या कामांसाठी अनुदान मंजूर होणार नाही.
  • या योजनेतील अनुदान मिळालेल्या बाबीसाठी भविष्यात नव्याने अनुदान नाही.
  • सन 2023-24 मध्ये सादर केलेल्या अर्जांपैकी पात्र अर्ज व्यतिरिक्त इतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
प्राधान्यक्रम (सुविधा निर्मिती)
ज्यांच्याकडे शेड व पाण्याची व्यवस्था नाही – प्राथमिक प्राधान्य
ज्यांच्याकडे एक सुविधा आहे – उर्वरित सुविधेसाठी अनुदान
दोन्ही सुविधा असल्यास – वैरण/मुरघास/गांडूळखत/गोमूत्र प्रकल्पसाठी
04
देय अनुदान

गोशाळेकडे असलेल्या पशुधन संख्येनुसार दोन टप्प्यांत अनुदान वितरित केले जाते :

अ.क्र.पशुधन संख्याएकूण अनुदानप्रथम टप्पा (६०%)द्वितीय टप्पा (४०%)
५० ते १००₹ १५ लाख₹ ९ लाख₹ ६ लाख
१०१ ते २००₹ २० लाख₹ १२ लाख₹ ८ लाख
२०० पेक्षा जास्त₹ २५ लाख₹ १५ लाख₹ १० लाख
निधी वितरण पद्धती
६०%
प्रथम टप्पा
मंजुरीनंतर वितरित
३ महिन्यांत विनियोग बंधनकारक
४०%
द्वितीय टप्पा
प्रथम टप्पा विनियोग + तांत्रिक तपासणी + CA प्रमाणपत्र नंतर
सदर योजनेअंतर्गत निर्माण करावयाच्या मूलभूत सुविधा
🏗️नवीन गोठा / शेड बांधकाम
💧पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
🌊विहीर / बोअरवेल
विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र
🌿मुरघास प्रकल्प
🪱गांडूळखत निर्मिती प्रकल्प
♻️गोमूत्र / शेण उत्पादन प्रकल्प
🏪मूल्यवर्धित विक्री केंद्र
❌ अनुदान पात्र नाही
जुन्या शेड / गोठ्यांची दुरुस्ती
कृषी / विद्युत जोडणी खर्च
पूर्वपरवानगीशिवाय केलेली कामे
05
गोशाळा निवड प्रक्रिया

अर्ज सादरीकरण ते अनुदान वितरण – संपूर्ण प्रक्रिया :

स्थानिक प्रसिद्धी
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी व्यापक प्रसिद्धी करणे व पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारणे.
जिल्हास्तरीय छाननी
प्राप्त अर्जांची जिल्हास्तरावर प्राथमिक तपासणी व प्रादेशिक समितीकडे सादर.
प्रादेशिक छाननी
प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांच्या स्तरावर छाननी व गोसेवा आयोगाकडे सादर.
गोसेवा आयोग तपासणी
महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालय स्तरावर छाननी व शासनास प्रस्ताव सादर.
राज्यस्तरीय निवड समिती
मंत्री (पशुसंवर्धन) अध्यक्षतेखालील समितीद्वारे अंतिम मंजुरी व निवड.
🏢 प्रादेशिक छाननी समिती
प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनअध्यक्ष
सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तसदस्य
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (प्रादेशिक कार्यालय)सदस्य सचिव
🏛️ राज्यस्तरीय निवड समिती
मा. मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास)अध्यक्ष
मा. राज्यमंत्री (पशुसंवर्धन)उपाध्यक्ष
प्रधान सचिव / सचिव (पदुम)सदस्य
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणेसदस्य
वित्त विभाग प्रतिनिधी (उपसचिव दर्जापेक्षा कमी नाही)सदस्य
नियोजन विभाग प्रतिनिधी (उपसचिव दर्जापेक्षा कमी नाही)सदस्य
तीन अशासकीय सदस्यसदस्य
उप सचिव / सह सचिव (पशुसंवर्धन)सदस्य सचिव
06
योजनेची सद्यस्थिती व प्रगती
दि. १६.०२.२०२४
पहिला वितरण टप्पा
१५२
पात्र गोशाळांना अनुदान मंजुरी
दि. ०४.०९.२०२४
दुसरा वितरण टप्पा
१९
अतिरिक्त गोशाळांना मंजुरी
दि. ०७.०४.२०२५
तिसरा वितरण टप्पा
३०
उर्वरित ४३ पैकी ३० गोशाळांना मंजुरी
एकूण निकाल (२०१ निवडलेल्या गोशाळा)
प्रथम टप्पा ६०% अनुदान वितरित१७९ गोशाळा
द्वितीय टप्पा ४०% अनुदान वितरित१४१ गोशाळा
शासन स्तरावरून अपात्र२ गोशाळा
अनुदान नाकारलेल्या गोशाळा७ गोशाळा
निकष पूर्तता अभावी अपात्र९ गोशाळा
तक्रार अनुषंगाने अनुदान Hold३ गोशाळा
उदाहरणार्थ मंजूर संस्था
जिल्हातालुकासंस्थाअनुदान
पुणेभोरतक्षशीला गोशाळा₹ १५ लाख
पुणेमावळबाळकृष्ण गोशाळा ट्रस्ट₹ २५ लाख
सोलापूरद. सोलापूरश्री कट्टेवाडेवी गोशाळा₹ १५ लाख
सोलापूरबार्शीश्री नवकार जैन सेवा तीर्थ₹ २५ लाख
07
आवश्यक कागदपत्रे व अर्ज सोबत जोडावयाच्या बाबी
टप्पा १

प्रथम टप्प्यासाठी कागदपत्रे

६०% अनुदान मिळण्यासाठी
60%
विहित नमुन्यातील अर्ज
गोशाळेच्या अनुदान मिळणेबाबतचा अधिकृत अर्ज
अनिवार्य
प्रपत्र – १
गोवंशीय पशुधन गणना व Ear Tag नोंदणी तपासणी अहवाल (NDLM)
अनिवार्य
प्रपत्र – २ (PWD)
मूलभूत सुविधांच्या खर्च अंदाजपत्रकाचे तांत्रिक प्रमाणीकरण
अनिवार्य
प्रपत्र – ३ (करारनामा)
रु. ५०० च्या बाँड पेपरवर नोटराइज्ड करारनामा
बाँड पेपर
परिशिष्ट "अ" – शपथपत्र
अधिकृत शपथपत्र विहित नमुन्यात
अनिवार्य
लेखापरीक्षण अहवाल
मागील ३ वर्षांचे संपूर्ण लेखापरीक्षण अहवाल
३ वर्षे
धर्मादाय आयुक्त नोंदणी
धर्मादाय आयुक्त यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र
अनिवार्य
बँक खाते तपशील
IFSC कोडसह राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते तपशील (DBT साठी)
DBT
टप्पा २

द्वितीय टप्प्यासाठी कागदपत्रे

४०% अनुदान मिळण्यासाठी
40%
उपयोगिता प्रमाणपत्र (UC)
CA द्वारे प्रमाणित — वितरित प्रथम टप्पा निधीचा संपूर्ण विनियोग अहवाल
CA प्रमाण.
तांत्रिक प्रमाणपत्र
बांधकाम / विद्युतीकरण योग्य असल्याचे जिल्हा PWD कार्यालयाचे प्रमाणपत्र
PWD
संयुक्त तपासणी समिती अहवाल
काम पूर्णता अहवाल + छायाचित्रे (Before & After) + शिफारस पत्र
अनिवार्य
अटी पूर्तता प्रमाणपत्र
सर्व शासन निर्णय अटींची पूर्तता झाल्याचे घोषणापत्र
अनिवार्य
DBT
थेट लाभ हस्तांतरण
Direct Benefit Transfer
अनुदान थेट राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा होईल
सनदी लेखापालाच्या (CA) प्रमाणपत्रासह अहवाल बंधनकारक
आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांना अहवाल सादर करणे अनिवार्य
⚠️
महत्त्वाची सूचना : पूर्वपरवानगीशिवाय केलेल्या कोणत्याही कामासाठी अनुदान मंजूर केले जाणार नाही. सर्व कामे प्रशासकीय विभागाच्या पूर्वमंजुरीनेच करावीत.
अधिकृत
महाराष्ट्र शासन राजपत्र — अधिकृत प्रकाशन | शासन निर्णय क्र. पविआ-2021/प्र.क्र.356/पदुम-3
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी १००% राज्य पुरस्कृत निधी महाराष्ट्र गोसेवा आयोग लेखाशीर्ष 2403 D-257, मागणी क्रमांक D-4, 33-अर्थसहाय्य या उद्दिष्टाखाली उपलब्ध निधीतून भागविण्यात येतो. दिनांक 17/05/2023 च्या शासन निर्णयाद्वारे 2023-24 पासून "सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र" योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली असून शासन आदेश दि. 11/07/2024 अन्वये सदर योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे.
08
नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत निवड करावयाच्या उर्वरित तालुक्यांचा जिल्हानिहाय तपशील
🗺️विभाग
🏛️३०जिल्हे
📍१४५उर्वरित तालुके
🐄१४५नवीन गोशाळा निवड होणार
विभाग १

कोकण विभाग

३० तालुके
ठाणे
उल्हासनगरअंबरनाथ
पालघर
डहाणूजव्हारमोखाडाविक्रमगड
रायगड११
पेणअलिबागमुरुडउरणमाणगावतळासुधागडमहाडपोलादपूरश्रीवर्धनम्हसळा
रत्नागिरी
रत्नागिरीसंगमेश्वरलांजागुहागरमंडणगडखेड
सिंधुदुर्ग
वैभववाडीदेवगावमालगावसावंतवाडीकुडाळवेंगुर्लाडोडामार्ग (कासल)
विभाग २

पुणे विभाग

२५ तालुके
पुणे
पुणे शहरपिंपरी चिंचवडजुन्नरआंबेगाव (घोडेगाव)भोर
सातारा
जावलीकोरेगावमहाबळेश्वरखंडाळा
सांगली
मिरजकवठे मंहाकाळतासगावशिराळाखानापूर (विटा)आटपाडीपलूसकडेगाववाळवा (इस्लामपूर)
कोल्हापूर
कागलहातकणंगलेगगनबावडाभुदरगडगडहिंग्लजचंदगडआजरा
विभाग ३

नागपूर विभाग

४२ तालुके
नागपूर
नागपूर (ग्रामीण)कामठीहिंगणासावनेरकळमेश्वरमौदापारशिवनीकुहीभिवापूर
भंडारा
पवनीमोहाडीलाखांदूर
चंद्रपूर
सावलीमूलपोंभुरणागोंडपिपरीवरोरासिंदेवाहीराजूराकोरपनाजिवती
गडचिरोली१२
गडचिरोलीधानोराचामोर्शीमुलचेरादेसाईगंज (वडसा)आरमोरीकुरखेडाकोरचीअहेरीभामरागडसिरोंचाएटापल्ली
गोंदिया
तिरोडागोरेगावअजुर्नी मोरगावसालेकसासडक अजुर्नीदेवरी
वर्धा
सेलूकारंजाआष्टी
विभाग ४

नाशिक विभाग

१२ तालुके
नाशिक
दिंडोरीपेठसुरगानाबागलाण (सटाना)चांदवडनिफाडसिन्नर
जळगाव
एरंडोलधरणगावपारोळाभडगाव
नंदुरबार
अकरानी (धडगाव)
विभाग ५

अमरावती विभाग

१५ तालुके
अमरावती
भातुकलीधारणीचिखलदराअंजनगाव
अकोला
तेल्हारा
बुलढाणा
देऊळगावसंग्रामपूरमोताळाशेगावसिंदखेड राजालोणार
यवतमाळ
आर्णीनेरघाटंजीमोरगाव
विभाग ६

छत्रपती संभाजीनगर विभाग

२१ तालुके
छ. संभाजीनगर
फुलंब्री
बीड
केज
जालना
जाफराबादअंबडमंठा
धाराशिव
तुळजापूरलोहाराउमरगा
नांदेड
नांदेडभोकरउमरीदेगलूरनायगाव
परभणी
पाथरी
लातूर
रेणापूरजळकोटशिरूर अनंतपाळऔसानिलंगादेवणी
हिंगोली
वसमत
एकूण विभाग
एकूण जिल्हे३०
एकूण तालुके१४५